For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : न. प. अधिकारी शेडगेंवर कारवाई करा 

12:30 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   न  प  अधिकारी शेडगेंवर कारवाई करा 
Advertisement
                                                              शिंदे शिवसेनेचे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे मागणी
Advertisement

चिपळूण:  कर व प्रशासकीय अधिकारी सागर शेडगे यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह नगर परिषदेची राज्यात बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी शिंदे शिवसेनेने मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्ष सकपाळ व शेडगे वादावर सेना आता आक्रमक झाली असून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सकपाळ काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार माजी सैनिक असलेल्या शेडगे यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेकडे केली. त्यानुसार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री व अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून याबाबत सकपाळ यांनी लेखी माफी मागावी अन्यथा राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तर शेडगे हे जीवितास धोका असल्याचे कारण देत रजेवर गेले असून बदलीसाठी प्रयत्न करीत आहेत. बुधवारी मुख्याधिकारी जाधव यांची भेट घेत त्यांना स्वतःला काय समजतात, त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे.
ते कायमच नागरिकांना माजी सैनिक असल्याचे सांगून चिपळुणात शिंदे शिवसेना आक्रमक नगराध्यक्ष, नगर परिषदेची बदनामी केल्याचा आरोप धमकावतात, यातून त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली.
जर आपण कारवाई केली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवेल, होणाऱ्या परिणामांची आम्हाला चिंता नाही, असा इशारा देतानाच शेडगे यांच्या चुकीच्या कामाचा अहवाल तयार करा, तो वरिष्ठांकडे पाठवा, त्यांची रजा नांमजूर करुन त्यांना कामावर हजर होण्याच्या लेखी सूचना द्या, अशी मागणी केली. त्यानुसार कार्यवाही केली जाईले, असे आश्वासन मुख्याधिकारी जाधव यांनी दिले. 
त्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला. येथेही पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदन दिले. यावेळी पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिक्षण सभापती हर्षाली पवार, नगरसेवक उदय जुवळे, गटनेते अंकुश आवले, प्रमोद बुरटे, विकी लवेकर, राणी महाडिक, नीलम जाधव, सुयोग चव्हाण, परिमल भोसले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Advertisement
Tags :

.