महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गृहमंत्रीपदासाठी शिंदे ठाम

06:55 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्रीपदाचे त्रांगडे मिटले : महायुतीची शुक्रवारची बैठक रद्द:

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

Advertisement

महायुतीत मुख्यमंत्री कोण हा विषय मिटला आहे. अजित पवार यांनी अगोदरच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देऊन आपली बाजू सेफ केली आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल सांगत सरकारमध्ये आपला अडसर नसल्याचे म्हटले आहे. तरी अजूनही सरकारला शपथविधी लांबला आहे. त्यामागचे गूढ काय, याबाबत अनेकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा अडसर दूर केला असला तरी गफहमंत्रीपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम असून यावरच सरकारचा शपथविधी अडून बसला असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री दिल्लीहून परत येताच त्यांनी सातारा गाठल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक रद्द झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी तहातही विजय संपादन केला. मात्र आता उपमुख्यमंत्रीपद न घेता ते पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्याला देण्याचीही त्यांचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दिल्लीतून अजून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गफहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गफहमंत्रिपद मिळाले तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीसच होणार मुख्यमंत्री : अतुल सावे

गेल्या काही दिवसांपासून या एकाच मुद्यावर सर्व चर्चा फिरताना दिसत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे बहुमत मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वात या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. मात्र महायुतीमधील पक्षांना मिळालेल्या आकड्यानंतर आता बरीच समीकरणे बदलली आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात बडे नेते म्हणून समोर आलेले मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे. अतुल सावे यांनी  यावर बोलताना सांगितलं की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार याचा आम्हाला आनंद आहे, कारण 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्राने प्रगती केली, तशीच प्रगती आता 2024 ते 2029 मध्ये फडणवीसांच्या नेतफत्वात होईल असे म्हणत सावेंनी फडणवीसच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असेही सूचवले आहे.

काळजीवाहू असल्याने सगळ्यांची काळजी : एकनाथ शिंदेंचा टोला

दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चेहरे हसरे होते, तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर होता. त्यामागचे कारण सांगताना शिंदे म्हणाले की, सध्या काळजीवाहू असल्याने सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते.  बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीची महाबैठक अतिशय सकारात्मक झाली. अजून एकदा बैठक होईल. त्यात महायुतीचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल. आता मुंबईत बैठक होणार आहे. अमित शहा आणि जे. पी. न•ा यांच्यासोबतही माझी चर्चा झाली. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मी पाठिंबा दिला आहे. भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. त्यानंतर मुख्यमंत्री शपथ घेतील. अमित शहा आणि जे. पी. न•ा यांच्याशी सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. वेगळे काहीही बोलणे झाले नाही. आमच्यात पूर्णपणे समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला राज्यातील जनतेने बहुमत दिले आहे. त्याचा आदर आम्ही करतो. लवकरच सरकार स्थापन करू, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे अस्वस्थ,पण नाराज नाहीत : उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी अजून मुख्यमंत्री नियुक्त होत नाही, सरकारचा शपथविधी होत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत, मात्र मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने ते बिलकूल नाराज नाहीत,अशी स्पष्टोक्ती उदय सामंत यांनी केली.

मुख्यमंत्री मोठा निर्णय घेऊ शकतात: शिरसाट

मुख्यमंत्री दिल्लीवरून आल्यानंतर थेट सातारा येथील आपल्या गावी गेले,याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे,याबाबत शिवसेना पक्षाचे प्रवत्ते संजय शिरसाट यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री जेव्हा द्विधा मनस्थितीत असतात,किंवा मोठा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा असेल तर विचार करण्यासाठी ते दरे या गावी जातात,त्यामुळे ते दोन दिवस विचार करून  मोठा निर्णय घेऊ शकतात असे शिरसाठ म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article