For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पणजीत आज शिमगोत्सव

11:22 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजीत आज शिमगोत्सव

वाहतूक व्यवस्थेत महत्वाचे बदल जाहीर : सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

पणजी : राजधानी पणजीत आज शनिवारी शिमगोत्सवानिमित्त ‘ओस्सय ऽऽ ओस्सय ऽऽऽ’चा गजर घुमणार असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेची जय्यत तयारी केली आहे. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असल्याने यंदा प्रथमच भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरून शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांनी नियोजनबद्ध आराखडा आखला आहे. शिमगोत्सवात सहभागी होणारी लोककला पथके  व चित्ररथ मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता सांता मोनिका जेट्टीपासून सुरवात होईल. त्यापूर्वी हे चित्ररथ रायबंदर कॉजवेवर एका रांगेत येतील. दुपारी दोन वाजल्यापासून सर्व चित्ररथांना दिवजा सर्कलपासून, सांता मोनिका जेट्टीजवळ मांडवी पुलाखालून सुरवातीच्या ठिकाणापर्यंत जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर ते पोलिसांच्या सूचना मिळाल्यानंतर जुने सचिवालय दयानंद बांदोडकर मार्गे जातील. केटीसी सर्कलकडून दिवजा सर्कलकडे कोणत्याही चित्ररथांना येण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी ते मेरशी - रायबंदर रोडवरून रायबंदर कॉजवेकडे येण्यासाठी बायपास रोडने पुढे जाण्यासाठी मेरशी सर्कलकडे वळवले जातील. शहरात वाहनांना प्रवेश बंदी लक्षात घेता, कोणत्याही अवजड/व्यावसायिक वाहनांना सकाळी 7 वा.  ते मिरवणूक संपेपर्यंत शहरात प्रवेश देऊ नये. त्याचप्रमाणे दोनापावला येथून येणाऱ्या सर्व टुरिस्ट बसेससह अवजड आणि इतर व्यावसायिक वाहनांना पलीकडे परवानगी दिली जाणार नाही.

पणजी शहराकडे येणारी वाहतूक

Advertisement

पणजी शहरात येणारी वाहतूक दिवजा सर्कलमार्गे नवीन पाटो पुलमार्गे चर्च चौक / क्रॉस रोड जंक्शनमार्गे पुढे जाण्यासाठी दयानंद बांदोडकर पुतळ्याजवळून शहरात वळवली जाईल. बांबोळीच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना नवीन मळा पूल ते चार खांब जंक्शन, त्यानंतर भाटलेमार्गे पणजी शहरात प्रवेश दिला जाईल. एकदा मिरवणूक सुरू झाल्यानंतर दयानंद बांदोडकर मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही सिटी बसला दोन्ही दिशेने धावण्याची परवानगी दिली जाणार नाही. रायबंदर बाजूकडून पणजीकडे येणारी वाहतूक मेरशी अंडरपास मार्गे रायबंदर कॉजवे येथे वळवली जाईल.

Advertisement

पणजी शहरातून जाणारी वाहतूक

मिरामार बाजूकडील मार्गावरील बसेससह जाणारी वाहतूक कांपाल गणेश मंदिर किंवा कला अकादमी येथून उजवीकडे वळण घेऊन अग्निशमन दल जंक्शन, सांत इनेज जंक्शन, काकुलो आयलँड, 18 जून रस्ता, चर्च चौक, कोर्तिनमार्गे पुढे  जाईल. यानंतर जुन्या पाटो पुल किंवा मळामार्गे पुढे जाईल. रूअ - दे - ओरेम येथून हॉटेल सोनाजवळ पोहोचल्यावर वाहतूक डावीकडे जाऊ दिली जाणार नाही. ही वाहतूक उजवीकडे वळवली जाईल.

अशी असेल पार्किंग व्यवस्था

शिमगोत्सवाच्या मिरवणुकीसाठी उत्तर गोव्यातून येणारी सर्व वाहने ईडीसी प्लाझा / एमएलसीपी येथे आणि केटीसी बसस्थानकाजवळ उभी केली जातील. दक्षिण गोव्यातून शिगमोत्सवासाठी येणारी सर्व वाहने गोमेकॉ, गोवा विद्यापीठ ते एनआयओ सर्कल, तेथून पुढे मिरामारमार्गे काम्पाल परेड मैदानावर पार्क करण्यात येतील.

नो पार्किंग झोन

  • जोस फाल्काओ रोड
  • जोआओ कॅस्ट्रो रोड
  • मॅच कॉर्नर ते कासा इंटरनॅशनल (एम. जी. रोड)
  • काकुलो बेट ते सांत इनेज जंक्शन
  • चर्च स्क्वेअर ते कोर्ती फूटब्रिज
Advertisement
Tags :
×

.