कुडाळात महायुतीच्या वतीने "शिमगोत्सव" कार्यक्रम
२९ ते ३० मार्च दरम्यान आयोजन
वार्ताहर/कुडाळ
महायुतीच्यावतीने कुडाळ येथे "शिमगोत्सव" कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता येथील तहसीलदार कार्यालया नजीकच्या क्रिडांगणावर रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा तर 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता गुढी पाडव्या निमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे. स्पर्धेतील विजेत्यांना उचित मानधन देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धेकांना मानधन तर नृत्य चलचित्रे देखावे येतील त्यांनाही मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे जिल्हा कार्यध्यक्ष काका कुडाळकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मंत्री व भाजपच्या मंत्र्यांची उपस्थिती असणार असल्याचे श्री. कुडाळकर यांनी सांगितले.कुडाळ-एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर आज महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, संजय पडते, दादा साईल,अरविंद करलकर, बंटी तुळसकर, रत्नाकर जोशी उपस्थित होते.