For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

26 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार शिल्पा शिरोडकर

06:04 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
26 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार शिल्पा शिरोडकर
Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 90 चे दशक सर्वात स्मरणीय राहिले होते. याच काळात अनेक अभिनेत्री आणि अभिनेते सुपरस्टार झाले. परंतु काही कलाकार प्रसिद्धी मिळाल्यावर अचानक गायब झाले. त्यातील एक अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील होती, ज्याला एका चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि मग ती प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेली. परंतु शिल्पा आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास तयार असून ती कॉमेडीपट मालामाल वीकलीच्या सीक्वेलमध्ये दिसून येणार आहे.  खुदा गवाह, गोपी किशन आणि हम चित्रपटांमधील नायिका शिल्पा आता स्वत:साठी दमदार भूमिका शोधत आहे. वैयक्तिक कारणांमुळे अभिनयापासून दूर राहिलेली शिल्पा मागील वर्षी जटाधारा या दाक्षिणात्य चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत दिसून आली होती. परंतु हा चित्रपट यशस्वी ठरला नव्हता. 2006 मध्ये प्रदर्शित मालामाल वीकली चित्रपटाचा सीक्वेल आता तयार केला जाणार असून यात शिल्पा दिसून येणार आहे. निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला असून शिल्पाला कहाणी अन् स्वत:ची भूमिका पसंत पडली आहे.  या चित्रपटात परेश रावल, रविना टंडन अन् परिणिती चोप्राही दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.