For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दोडामार्गच्या शिल्पा खोत

12:18 PM Mar 31, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दोडामार्गच्या शिल्पा खोत
Advertisement

दोडामार्गातील नागरिकांकडून अभिनंदनाचा होतोय वर्षाव

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दोडामार्ग बाजारपेठेतील कन्या विराजमान झाली आहे . अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सौ.शिल्पा शशिकांत खोत या येथील पूर्वाश्रमीच्या शिल्पा मनोहर प्रसादी असून संपूर्ण शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . येथील बाजारपेठेत फार पूर्वीपासून मनोहर प्रसादी यांचे कुटुंब वास्तव्यास होते. सध्या श्री . प्रसादी हे दोडामार्ग बाहेर वास्तव्यास आहेत . त्यांच्या एकूण चार मुलींपैकी शिल्पा मनोहर प्रसादी ( विवाह नंतर चे नाव शिल्पा शशिकांत खोत) यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मधील कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या सौ. खोत यांच्या अध्यक्षपद निवडीचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले आणि एकच आनंद व्यक्त झाला. आपले संपूर्ण बालपण , सर्व शिक्षण दोडामार्ग शहरात केलेल्या सौ. शिल्पा यांच्या निवडीबद्दल शहरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले असून लवकरच त्यांचा एक भव्य नागरी सत्कार करण्याचे ठरविले जात आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.