For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी येथील चेकपोस्ट नाक्याचे स्थलांतर

10:31 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी येथील चेकपोस्ट नाक्याचे स्थलांतर
Advertisement

मजगाव : पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी चौकात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून तेथे परराज्यातून येणारी चारचाकी वाहन तपासणी अहोरात्र सुरू होती. परंतु संगोळ्ळी रायण्णाची मूर्ती व बाजूलाच चेकपोस्ट मंडप होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. एखादे वाहनतपासणीवेळी वाहतुकीची कोंडी होत होती. आणि लहानसहान अपघातही झाल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन रविवारी सकाळी सदर चेकपोस्ट त्या ठिकाणाहून काढून लक्ष्मी मंगल कार्यालयानजीक चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणारी गर्दी कमी झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.