शेट्टी किंग्ज्, राहुल केआर, भारत, ग्रो स्पोर्ट्स विजयी
पॅब चषक साखळी निमंत्रतांची फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स पुरस्कृत फॅब चषक निमंित्रतांच्या आंतर क्लब सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेत के आर शेट्टी किंग्जने ओल्ड फाटा चा, राहुल केआर शेट्टीने डिसाईडरचा, भारत एफसीने सिग्नेचरचा तर ग्रो स्पोर्ट्सने रॉ फिटनेसचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. वडगाव येथील सीआरसेव्हन स्पोर्ट्स एरियना फुटबॉल टर्फ मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिला सामन्यात केआर शेट्टी किंग्ज्सने ओल्ड फाटाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला किरण निकमच्या पासवर जयेश सांबरेकरने गोल करून 1-0 आघाडी मिळवून दिली. अकराव्या मिनिटाला जयेशच्या पासवर किरण निकम गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 17 व 22 व्या मिनिटाला किरण निकमच्या पासवर जयेश सांबरेकरने सलग दोन गोल करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. 25 व्या मिनिटाला ओल्ड फाटाच्या सुशांत बोळगुंडीने गोल करून 1-4 अशी आघाडी कमी केली.
दुसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने टेनटेन एफसीला 1-1 अशा बरोबरीत रोखले. सामन्याच्या 9 व्या मिनिटाला टेनटेनएफसीच्या निखिल निसरीकरच्या पासवर राहुल गुरवने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 15 मिनिटाला अनिकेतच्या पासवर नागेश सोमनघीने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. तिसऱ्या सामन्यात राहुल केआर शेट्टी संघाने डिसाईडर एफसीचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱ्या मिनिटाला मिथिल मंडोळकरच्या पासवर नदीम मकानदारने गोल करून 1-0 अशा आघाडी मिळून दिली. 12 व्या मिनिटाला नदीम मकानदारच्या पासवर इकलास निजामीने गोल करून 2-0 अशा आघाडी मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 16 व्या मिनिटाला इकलासच्या पासवर नदीम मकानदारने तिसरा गोल करून 3-0 अशा आघाडी मिळून दिली. 21 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर मिथिल मंडोळकरने चौथा गोल करून 4-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
चौथ्या सामन्यात भारत एफसीने सिग्नेचर संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला ओमकार मण्णूरकरच्या पासवर अमृत मण्णूरकर गोल करून 1-0 अशी आघाडी मिळून दिली. 17 व्या मिनिटाला अमृत मण्णूरकर च्या पासवर ओमकार मण्णूरकरने दुसरा गोल करून 2-0 अशा आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सिग्नेचर संघाला गोल करण्यात अपयश आले. पाचव्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्स एफसीने रॉ फिटनेसचा 2-1 असा पराभव करून दोन गुण मिळवले. या सामन्यात आठव्या मिनिटाला उमर कालकुंद्रीकरच्या पास वर प्रशांत पाटीलने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 13 व्या मिनिटाला हयान शेखच्या पासवर सुपीयान सय्यदने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 20 व्या मिनिटाला इरफान बिस्ती च्या पासवर प्रशांत पाटीलने दुसरा गोल करून 2-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रॉ फिटनेसने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्या संघला अपयश आले.
आजचे सामने
- डिसाईडर एफसी वि. सिग्नेचर एफसी यांच्यात दुपारी 4.00 वा.
- राहुल के आर शेट्टी वि. रॉ फिटनेस यांच्यात सायंकाळी 4.40 वा.
- भारत एफसी वि. केआर शेट्टी किंग्ज्स यांच्यात सायंकाळी 5.20 वा.
- टेनटेन मण्णूरकर एफसी वि. ग्रो स्पोर्टस एफसी यांच्यात सायंकाळी 6.00 वा.
- ओल्ड फाटा वि. साईराज वॉरियर्स यांच्यात सायंकाळी 6.40 वा.
- रॉ फिटनेस वि. डिसायर्डर एफसी यांच्यात सायंकाळी 7.30 वा.