महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विकासात्मक राजकारणाची शेट्टर यांच्याकडून हमी

10:03 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध समाजातील प्रमुखांशी साधला संवाद : मतदान करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : भाजपने आजवर सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान दिला आहे. त्यामुळे प्रत्येक समाज भाजपसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे खासदार झाल्यास सर्व समाजांना घेऊन विकासात्मक राजकारण करू, असे आश्वासन भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत दिले. जगदीश शेट्टर यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील जैन, ब्राह्मण, बंटर यासह विविध समाजातील प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजपने मागील दहा वर्षात देशभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी जगदीश शेट्टर यांनाच मतदान करण्याचे आवाहन करून प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

Advertisement

रामदुर्ग येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी रामदुर्ग तालुक्याचा दौरा केला. यावेळी रामदुर्ग येथील गोडची वीरभद्रेश्वर मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतला. याबरोबरच रामदुर्ग तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपने रामदुर्ग तालुक्यात अनेक विकासात्मक कामे केली असून यापुढेही रामदुर्गचा विकास होईल, असेच कार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article