For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेट्टर यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही

10:55 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेट्टर यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : अरभावी मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना बेळगाव येथे येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. स्वार्थाचे राजकारण साधण्यासाठी ते आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मत देऊन निवडून आणावे. शेट्टर यांनी जिल्हा पालकमंत्री असताना बेळगाव जिल्ह्यावर अन्याय केला आहे. अशी व्यक्ती आपल्याला हवी आहे का? असा प्रश्न मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अरभावी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राज्यात बहुमताने निवडून आल्याने केंद्र सरकारकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. गोरगरिबांना तांदूळ वितरण करण्यासाठी तांदळाची मागणी करण्यात आली होती. मात्र, तांदूळ देण्यात आला नाही. पक्षपाती राजकारण केले जात आहे. असे असले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तांदळाऐवजी पैसे देऊन गरिबांना मदत करत आहेत. पाच गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी करून अनेकांना लाभ करून देण्यात आला आहे. यासाठी बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर व चिकोडी मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तुकानट्टी येथे केपीसीसी मागासवर्गीय विभागाचे कार्यदर्शी भरमाण्णा उप्पार म्हणाले, राज्य सरकारने गोरगरिबांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मंत्री हेब्बाळकर या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करीत आहेत. आता त्यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर निवडणुकीच्या मैदानात असून त्यांना जनसेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमाप्पा हंदीगुंद, अनिलकुमार दळवाई, भरमाण्णा उप्पार, सुभाष पुजारी, रमेश उटगी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.