For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या विकासाचे शेट्टर यांचे आश्वासन

10:54 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या विकासाचे शेट्टर यांचे आश्वासन
Advertisement

गाणिग समाजाच्या बैठकीत साधला संवाद

Advertisement

बेळगाव : भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी विविध समाजांच्या प्रमुखांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. रविवारी रात्री सदाशिवनगर येथील गाणिग समाज विकास संघात प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाच्या विकासासाठी संपूर्ण गाणिग समाजाने जगदीश शेट्टर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, हुबळी-धारवाड जिल्ह्याप्रमाणेच बेळगावचाही विकास केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून मोठे उद्योग, औद्योगिक वसाहती साकारल्या जाणार आहेत. मागील दहा वर्षात त्यांनी देशाची सुरक्षा, आर्थिक प्रगती, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, विविध प्रकल्पांची उभारणी यामध्ये भरीव कामगिरी केल्यामुळे नागरिकांनी नरेंद्र मोदी यांनाच तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले.

देशाच्या सर्वोच्च पदावर असणारे मोदी हे स्वत:ला देशाचे सेवक समजतात. यावरूनच त्यांच्या विचारांची उंची समजून येते. हुबळी-धारवाडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या दोन्ही शहरांचा सर्वांगीण विकास केला. त्यापेक्षाही अधिक गतीने बेळगावचा विकास मी करणार आहे. सुरेश अंगडी, मंगला अंगडी यांच्या कार्यकाळात रेल्वे आणि विमान वाहतूक क्षेत्रात बेळगावची मोठी प्रगती झाली. देशात अग्रेसर असणारे बेळगावचे नवे मॉडेल आणण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. या सभेवेळी खासदार मंगला अंगडी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, समाजाचे प्रमुख प्रकाश बाळेकुंद्री, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.