For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेट्टर विजयी झाल्यास मंत्री होतील!

10:53 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेट्टर विजयी झाल्यास मंत्री होतील
Advertisement

आमदार जनार्दन रेड्डी यांचा विश्वास : रामदुर्ग तालुक्यात जोरदार प्रचार

Advertisement

बेळगाव : जगदीश शेट्टर हे राज्यातील अनुभवी नेतृत्व आहे. यापूर्वी त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, विधानसभेचे सभापती म्हणून काम केले आहे. शेट्टर यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असून खासदार म्हणून बेळगावला नक्कीच फायदा होईल. शेट्टर यांना बेळगावमधील नागरिकांनी संधी दिल्यास ते केंद्रात मंत्री होतील, असा विश्वास गंगावतीचे आमदार जनार्दन रेड्डी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बुधवारी रामदुर्ग मतदारसंघातील सुरेबान गावात आयोजित सभेत ते बोलत होते. जगदीश शेट्टर यांनी सहा वेळा आमदार म्हणून मतदारसंघाचा विकास केला आहे. पोकळ आश्वासने देऊन सत्तेत आलेले काँग्रेस सरकार फार काळ टिकणार नाही. काँग्रेसच्या भुलथापांना बळी न पडता विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना गोकाक तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रचारफेरी तसेच विविध गावांत घेण्यात आलेल्या कॉर्नर सभांना हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तालुक्यातील नभापूर, खणगाव, मिडकनहट्टी, मकळ्ळगेरी, ममदापूर, हिरेनंदी आदी गावांमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभांना मोठी गर्दी झाली होती. यावेळी विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, विधानपरिषद माजी सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण, माजी आमदार महादेवप्पा यादवाड, विणकर समितीचे सदस्य बी. एस. सोमशेखर, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, अशोक पाटील, चिक्करेवण्णा यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.