For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे शेट्टर यांचा किल्ला तलाव परिसरात प्रचार

11:15 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे शेट्टर यांचा किल्ला तलाव परिसरात प्रचार
Advertisement

बेळगाव : भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी सकाळी बेळगावमधील किल्ला तलावानजीक प्रचार केला. किल्ला तलाव परिसरात आलेल्या मॉर्निंग वॉकर्ससोबत चाय पे चर्चा करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बसवेश्वर को-ऑप. सोसायटीच्या संचालकांसोबत बैठक घेऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. रविवार पेठ येथे झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना अनिल बेनके म्हणाले, व्यापाऱ्यांचे प्रश्न भाजपने सोडविले आहेत. त्यामुळे या वेळेलाही व्यापारीवर्ग भाजपच्याच बाजूने उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बसवराज उप्पीन, गिरीश बागी यांच्यासह इतर उपस्थित होते. जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बैलहोंगल तालुक्यात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेमुळे अनेक गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये जमा होत असल्याने त्यांना घरखर्च चालविणे सोयीचे होत असल्याचे सांगितले. याबरोबरच उज्ज्वला योजनेमुळे घरांमध्ये होणारा चुलीचा धूर कमी होऊन घरोघरी एलपीजी गॅस कनेक्शन आल्याने ही देशात एकप्रकारची क्रांती मोदी यांच्यामुळेच झाल्याने त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.

Advertisement

मोदींच्या सभेसाठी घेतला आढावा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दि. 28 रोजी बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येत आहेत. बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील मालिनी सिटी येथे मोठी सभा होणार असून एक लाख लोकांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी मालिनी सिटी येथे सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.