For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून तुरमुरी कचरा डेपोची पाहणी

06:09 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून तुरमुरी कचरा डेपोची पाहणी
Advertisement

त.भा.वार्ताहर

Advertisement

उचगाव : तुरमुरी येथील कचरा डेपोला शनिवार दि. 2 मे रोजी बेळगाव जिह्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि या परिसरात पसरलेली दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ हे सारे पाहून तेही हादरून गेले. आणि येथील परिस्थिती फारच गंभीर असल्याचे मत व्यक्त करत सदर कचरा डेपो तातडीने बंद करण्यासाठी मी पूर्णत: प्रयत्न करीन, असे आश्वासन तुरमुरी आणि परिसरातील नागरिकांना दिले.

तुरमुरी कचरा डेपोच्या संदर्भात मोठी समस्या या संपूर्ण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असून नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. तसेच इतर अनेक समस्या या ठिकाणी या कचरा डेपोच्या संदर्भातून उद्भवल्या असल्याने येथील नागरिकांनी पुन्हा एकदा सदर कचरा डेपो बंद करण्याच्या संदर्भात उग्र आंदोलन हाती घेतले आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासंदर्भात या भागातील जनतेला आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी शनिवार दि. 2 मे रोजी या कचरा डेपोच्या परिसराला भेट दिली आणि यावेळी इथली परिस्थिती पाहणी केली.

Advertisement

यावेळी नागरिकांनी या कचरा डेपोच्या संदर्भातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या त्यांना समजावून सांगितल्या. या कचरा डेपोच्या परिसरात प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. देव देवतांची मंदिरे आहेत. आणि राहती घरे असून या सर्वांना याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे

6 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

यावेळी येथील सर्व परिस्थिती पाहून आणि नागरिकांचे होत असलेले हाल पाहून जगदीश शेट्टर यांनी 6 मे ला जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक बोलावून या कचरा डेपोच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ. कचरा डेपो बंद करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी उपस्थित जमलेल्या नागरिकांना आश्वासन दिले. आणि लवकरात लवकर हा कचरा डेपो बंद करू, असे आश्वासन दिले.

यावेळी बेळगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे विभागीय अध्यक्ष विनय कदम, बाळू अष्टेकर, बंडू कुद्रेमणीकर, पुंडलिक बेळगावकर, रघु खांडेकर, मारुती खांडेकर, राजू जाधव, रामा खांडेकर, ज्ञानेश्वर कोरडे, शिवाजी खांडेकर यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.