For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेट्टर यांचा शहर तसेच ग्रामीण भागात जोरदार प्रचार

06:13 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेट्टर यांचा शहर तसेच ग्रामीण भागात जोरदार प्रचार
Advertisement

समर्थनगरात प्रचारसभा : हिरेबागेवाडीत रोड शो

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मागील दोन दिवसात बेळगाव शहरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. शुक्रवारी समर्थनगर येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेला माजी मंत्री भैरती बसवराज उपस्थित होते. ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे जगदीश शेट्टर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भैरती बसवराज यांनी केले.

Advertisement

बेळगाव शहराचा विकास हा भाजप कार्यकाळातच झाला असून यापुढेही असाच विकास व्हायचा असेल तर भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेविका नेत्रावती भागवत, मुरगेंद्रगौडा पाटील यासह इतर उपस्थित होते.

बेळगाव विमानतळाने अल्पावधीतच लाखो प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास बेळगाव जिल्ह्यातील कृषी मालाला इतर देशांमध्ये निर्यात करणे सोयीचे होईल. तसेच शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल. यासाठी देशात भाजपचे सरकार येणे गरजेचे असल्याचे मत जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्ह्यातील मडिवाळ समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी जगदीश शेट्टर यांनी संवाद साधला. यावेळी बाळाप्पा मडिवाळ, राजकुमार मडिवाळ, हनुमंत मडिवाळ, दुंडाप्पा मडिवाळ यासह इतर उपस्थित होते.

शेट्टर यांनी मठाधीशांचे घेतले आशीर्वाद

जगदीश शेट्टर यांचे वडील मुरसावीर मठाचे भक्त होते. त्यामुळे मठाच्यावतीने जगद्गुरु गुरुसिद्ध राजयोगिंद्र स्वामीजींनी शनिवारी जगदीश शेट्टर यांना आशीर्वाद दिले. खासदार मंगला अंगडी यांच्या निवासस्थानी शेट्टर यांनी मठाधीशांचा आशीर्वाद घेतला. निवडणुकीत शेट्टर चांगली कामगिरी करतील, असा विश्वास मठाधीशांनी व्यक्त केला. यावेळी बैलहोंगल तसेच कोलार गाणिग समाजाचे स्वामी, अरळीकट्टी येथील विरक्त मठाचे स्वामी, घटप्रभा येथील होसमठाचे स्वामी, बिदर येथील विरक्त मठाचे स्वामी, तारिहाळ येथील अडिवेश मठ, गोविंद मठाच्या स्वामीजींनी आशीर्वाद दिला.

हिरेबागेवाडी येथे भव्य रोड शो

जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रात्री हिरेबागेवाडी येथे भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. तासभर चाललेल्या या रोड शोला आसपासच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा कमळ फुलणार, असा विश्वास जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, यल्लाप्पा धरेण्णावर, शंकरगौडा पाटील, बसलिंग मठपती, चेतना अंगडी, सिद्धू हुक्केरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.