शेर्ले ग्रामस्थांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले -पानोसेवाडी येथील प्रकाश राऊळ, अनिल राऊळ, महादेव राऊळ, मनोहर राऊळ, प्रभाकर राऊळ, अरुण राऊळ, देविदास राऊळ, समीर पोखरे, सागर राऊळ, तुषार राऊळ, पंचशीला जाधव, प्रशांत जाधव, चैताली जाधव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष बबन राणे, परीक्षित मांजरेकर, अनिल पिंगुळकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.यावेळी शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, तसेच शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर व बाबा धुरी, समीर पालव आदी उपस्थित होते.दरम्यान ,यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थांचे शिवसेनेत स्वागत असून त्यांच्या गावातील कोणत्याही समस्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून तात्काळ सोडविल्या जातील. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, प्रशासकीय स्तरावर सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेर्ले गावचा जास्तीत जास्त विकास शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल, असे अभिवचन दिले.