महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेखर होमचा ट्रेलर जारी

06:12 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रणवीर शौरी अन् के.के. मेनन हेराच्या भूमिकेत

Advertisement

शेखर होम ही नवी वेबसीरिज 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये रणवीर शौरी आणि के.के. मेनन, रसिका दुग्गल हे प्रतिभावंत कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शेखर होमचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात कोलकाता शहराची पार्श्वभूमी दर्शविण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी आणि रोहन सिप्पी यांनी मिळून केले आहे. तर कहाणी अनिरुद्ध गुहा, वैभव विशाल आणि निहारिका पुरी यांनी लिहिली आहे. समीर गोगटे यांनी याची निमिर्ती केली आहे. या सीरिजमध्ये कीर्ति कुल्हारी देखील दिसून येणार आहे.

Advertisement

ही सीरिज जियो सिनेमावर पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये के.के. मेनन हे हेराच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. ही सीरिज सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या साहित्यकृतींने प्रेरित एक मूळ काल्पनिक कृती असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीबीसी स्टुडिओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. केके मेनन यापूर्वी द रेल्वेमेन या सीरिजमध्ये दिसून आले होते. या सीरिजमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article