पाटकुलची शेजल चव्हाण धनुर्विद्या स्पर्धेत भारतात दुसरी
पाटकुल गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
पाटकुल प्रतिनिधी
पाटकुल येथील AJ आर्चरी अकॅडमी चे दि ८ व १० डिसेबर २०२३ रोजी वाडियार गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पाटकुल (ता. मोहोळ ) येथील अकॅडमी च्या खेळाडूंनी १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धे मध्ये दमदार यश संपादन करून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्पर्धेमध्ये शेजल शिवाजी चव्हाण हिने सांघिक रौप्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, यात प्रामुख्याने हरियाणा, पंजाब ,तमिळनाडू ,आंध्र प्रदेश ,मध्यप्रदेश ओडिसा या विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित होते, यात प्रामुख्याने १९ वर्षाखाली शालेय नॅशनल धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने महाराष्ट्राला अजिंक्यपद प्राप्त करून दिले. तसेच तिथे जमलेल्या वेगवेगळे मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाचे कौतुक करत देशातील सर्व प्रेक्षकांची मने जिंकली व महाराष्ट्राची मान देशात उंचावली. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण वडियार जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. AJ आर्चरी अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष अजित वसेकर, सागर सुर्वे , विठ्ठल माळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले. शेजल चव्हाण हिच्या या यशामुळे पाटकुल व पाटकुल परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.