कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मायदेशी परतण्यासाठी शेख हसींनाकडून अटी

06:22 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, ढाका

Advertisement

बांगलादेशच्या पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार आहेत. शेख हसीना यांनी त्यांच्या परतीसाठी युनूस सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. जर सध्याच्या बांगलादेश सरकारने देशात सहभागी लोकशाही पुनर्संचयित केली आणि अवामी लीगवरील बंदी उठवण्यासोबतच मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घेण्यास सहमती दर्शविली तर आपण मायदेशी परतण्यास तयार असल्याचे हसीना यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील एका अज्ञात ठिकाणाहून दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शेख हसीना यांनी युनूस सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. याप्रसंगी त्यांनी देशात निवडून न आलेले युनूस प्रशासन भारताशी संबंध धोक्यात आणत असल्याचा आणि दहशतवादी शक्तींना बळकटी देत असल्याचा आरोपही केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article