महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशात पुन्हा शेख हसिना सत्तेवर

06:45 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

222 जागांवर मिळाला विजय : विजयी उमेदवारांमध्ये अपक्ष दुसऱ्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेशच्या निवडणुकीत पंतप्रधान शेख हसिना यांनी स्वत:च्या पाचव्या कार्यकाळासाठी विजय निश्चित केला आहे. निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष बीएनपीने बहिष्कार टाकला असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात होते. शेख हसिना यांच्या अवामी लीग या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कुठलाही राजकीय पक्ष राहिला नसून अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगने 222 जागा जिंकल्या तर अपक्ष उमेदवारांनी 63 जागांवर यश मिळविले आहे.

हसिना यांनी गोपालगंज-3 मतदारसंघात पुन्हा मोठा विजय मिळविला आहे. त्यांना 2,49,965 मते मिळाली आहेत. तर बांगलादेश सुप्रीम पार्टीचे उमेदवार एम. निजाम उद्दीन लष्कर यांना केवळ 469 मते मिळाली ओत. बांगलादेशात 2009 पासून हसिना यांचे सरकार सत्तेवर आहे. यावेळच्या एकतर्फी निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यकाळ प्रात्त केला आहे. लोकांनी मतदान करत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या निवडणूक बहिष्काराला फेटाळले असल्याचा दावा अवामी लीगचे महासचिव ओबैदुल कादिर यांनी केला आहे. जातीय पार्टीचे अध्यक्ष जी.एम. कादिर यांनी रंगपूर-3 मतदारसंघात विजय मिळविला आहे.

मोठ्या प्रमाणावर शांततेत मतदान होऊनही शुक्रवारी रात्रीपासून देशभरात किमान 18 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून यात 10 मतदान केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. शांततापूर्ण सार्वजनिक भागीदारी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सरकारविरोधी आंदोलन तीव्र करण्याची योजना आखत आहेत. रविवारी झालेली निवडणूक ही बनावट असल्याचे बीएनपीच्या नेत्यांनी सांगितले आहे.

बीएनपीने 2014 च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, तर 2018 मध्ये निवडणुकीत भाग घेतला होता. यावेळी बीएनपीने पुन्हा बहिष्काराची भूमिका घेतली आहे. निवडणुकीत झालेले कमी मतदान पाहता बहिष्कार आंदोलन यशस्वी ठरल्याचे स्पष्ट आहे. शांततापूर्ण लोकशाहीवादी आंदोलन तीव्र करत लोकांना मतदानाचा अधिकार सुनिश्चित करणार आहोत असे बीएनपीकडून म्हटले गेले आहे.

पंतप्रधानांकडून विरोधी पक्ष लक्ष्य

काही किरकोळ घटना वगळता 300 पैकी 299 मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे एका जागेवर पुढील काणत मतदान करविले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे. बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांची आघाडी लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही. बीएनपी-जमात आघाडीने जाळपोळीसमवेत अनेक घटना घडवून आणल्याचा आरोप शेख हसिना यांनी केला आहे.

राजकीय पिचवर शाकिबची कमाल

बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने बांगलादेशच्या संसदेचे सदस्यत्व मिळविले आहे. त्याने स्वत:ची पहिली निवडणूक दीड लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकांनी जिंकली आहे. विरोधी पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याने शाकिबने यात सहजपणे विजय मिळविला आहे. मगुरा शहरातील मतदारसंघाचे तो प्रतिनिधित्व करणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article