For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहजाद पूनावालांचा भाजपला रामराम

06:21 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहजाद पूनावालांचा भाजपला रामराम
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी शुक्रवारी पक्षाला रामराम ठोकत राजीनामा दिला. भाजपचे दीर्घकाळ प्रवक्ते राहिलेल्या शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे प्रवक्तेपदाचा राजीनामा सादर केला आहे. मात्र, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजपमध्ये असताना शहजाद टीव्हीवरील चर्चा आणि सोशल मीडियावर आपल्या धारदार वक्तव्यांसाठी ओळखले जात होते. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या धोरणांचे सर्वात प्रभावी समर्थक मानले जात होते. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही वारंवार टीका केली होती.

Advertisement

शहजाद पूनावाला 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले. यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात काम केले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शहजाद यांनी या प्रक्रियेला केवळ एक ढोंग म्हणत ती पूर्वनियोजित असल्याचे सांगितले होते. भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आले. त्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख टीव्ही वादविवादकांपैकी एक बनले.

सोशल मीडियावरील ‘बायो’मध्ये बदल

शहजाद पूनावाला यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील बायो देखील बदलला आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये आपला नवीन बायो शेअर केला आहे. या नवीन बायोमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही.  पंतप्रधानांचा आदरपूर्वक उल्लेख करताना त्यांनी नरेंद्र मोदी हे आयुष्यभर आपले नेते राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ते काँग्रेस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षात सामील होणार नाहीत असे स्पष्ट होते. तथापि, ते राजकारणातून काही काळासाठी विश्रांती घेऊ शकतात अशी चर्चाही सध्या सुरू आहे.

Advertisement
Tags :

.