उत्तर विभाग संघाच्या कर्णधारपदी शेफाली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नागालँडमध्ये सुरू होणाऱ्या वरिष्ठ महिलांच्या आंतरविभागीय टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील शेफाली वर्माची उत्तर विभागाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
21 वर्षीय शेफालीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले. या सामन्यात तिने फलंदाजी करताना 87 धावा झोडपल्या तर गोलंदाजीत तिने 36 धावांत 2 गडी बाद केले. या कामगिरीमुळे शेफालीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. प्रतीका रावल उपांत्य फेरीत खेळताना जखमी झाल्याने शेफाली वर्माचा बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात अंतिम सामन्यासाठी समावेश करण्यात आला होता.
नागालँडमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार संघांचा समावेश राहील. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मध्य विभाग-नुझात परवीन, निकीता सिंग, सिमरन दिलबहाद्दुर, नेहा बडवेक, अनुष्का शर्मा, वैष्णवी शर्मा, सुची उपाध्याय, अनन्या दुबे, मोना मेशराम, सुमन मीना, दिशा कसात, संपदा दिक्षित, अंजली सिंग, अमिशा बहुखंडी, नंदिनी काश्यप.
उत्तर विभाग- शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, दीया यादव, आयुषी सोनी, तानिया भाटिया, एस. एम. सिंग, भारती रावल, बवानदीप कौर, मनत काश्यप, अमनदीप कौर, कोमलप्रित कौर, अनन्या शर्मा, सोनी यादव, नजमा नंदिनी,
पूर्व विभाग संघ- मिता पॉल, आश्विनी कुमारी, प्रियांका लुथ्रा, धारा गुर्जर, तनुश्री सरकार, रश्मी गुडीया, जे. कलिता, रश्मी डे, तन्मयी बेहरा, सुश्री डी., तितास साहू, सैका इशाकी, आरती कुमारी, ममता पासवान, प्रियांका ए.,
उत्तर-पूर्व विभाग संघ : डी. दत्ता, एन. यापु, किरणबाला एच., एल. पॉटु, आर. नोंगबेट, नजमीन खातुन, एस. प्रधान, प्रियांका कुर्मी, विपेनी, नंदिका कुमारी, नबम अभी, प्रनिता छेत्री, सोलीना जेबा, पी. क्षेत्री आणि के. रंजीता
पश्चिम विभाग-अनुजा पाटील (कर्णधार), सायली सातघरे, पुनम खेमनार, धर्णी टी., तेजल हसबनीस, सायमा ठाकुर, हुमारीया काझी, इरा जाधव, किरण नेवगीरी, अम्रिता जोसेफ, केशा पटेल, अरिशा धारीवाल, उमेश्वरी जेथवा, सिमरन पटेल, इशिता खाले.
दक्षिण विभाग : निकी प्रसाद (कर्णधार), एस. मेघना, जी. कमलिनी, वृंदा दिनेश, युवा श्री, आशा शोभना, सी. प्रत्युशा, प्राणवी चंद्रा, सहाना पवार, सायली लोणकर, माडीवाल ममता, सजना सजीवन, मोनिका पटेल, शबनम शकील आणि अनुषा सुदर्शन.