शितल वायंगणकर हिचे सीए परीक्षेत यश
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा येथील उद्योजक उदय वायंगणकर यांची कन्या कुमारी शितल वायंगणकर हिने चार्टर्ड अकाऊंटंट (सी. ए.) परीक्षेत पहिल्या फेरीतच यश मिळवले आहे. या परीक्षेत पहिल्या फेरीत यश मिळविणे ही कौतुकास्पद बाब आहे. कारण या परीक्षेचा निकाल हा देशपातळीवर असतो. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.शितल हिचे प्राथमिक शिक्षण ओरोस डॉन बॉस्को हायस्कूल येथे तर पुढील डिग्री पर्यंतचे शिक्षण पुणे येथील नामांकित बी. एम. सी. सी कॉलेज मध्ये घेतले. त्यानंतर सीए अभ्यासक्रमसाठी चेतन मयूर अँड कंपनी मधे तीन वर्षाची आर्टिकल शीप करताना ही परीक्षा देऊन हे यश मिळविले. तिच्या या यशाबद्दल कंपनीचे चेतन श्रॉफ, सचिन श्रॉफ, पूर्वा मंगल यांनी तिचे अभिनंदन केले.
फोटो कॅप्शन - चेतन मयूर अँड कंपनीच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन शितलचे अभिनंदन करण्यात आले.