महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिला हवा भारतीय तरुण, पण...

06:12 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलिकडच्या सोशल मिडियाच्या युगात लोक या माध्यमाचा उपयोग करुन काय संदेश प्रसिद्ध करतील, हे अनाकलनीय आहे. अशा काही पोस्टस् पाहून आपल्याला हसू आवरत नाही. तर काही पोस्टस् वाचल्यानंतर डोक्याला हात लावल्याशिवाय राहवत नाही. एका स्मार्ट रशियन तरुणीने आपल्याला लग्नासाठी भारतीय युवक हवा, अशी जाहीरात पोस्ट केली असून ती सध्या लोकप्रिय होत आहे. ही जाहिरात पाहून प्रथमदर्शनी भारतीय लग्नेछू युवक मनोमान सुखावल्याशिवाय रहात नाहीत. तथापि, पुढे या तरुणीने ज्या अटी नमूद केल्या आहेत, त्या पाहून हळूहळू या युवकांचा चेहरा आंबट होत गेल्यास आश्चर्य नाही.

Advertisement

तिची प्रथम अट अशी आहे, की आपल्याला हवा असलेला युवक किमान 6 फूट उंचीचा असावा. भारतात इतक्या उंचीचे युवक संख्येने कमीच. त्या या प्रथम अटीनेच 95 टक्के इच्छुकांची दांडी गुल होते. तिची दुसरी अट अशी की, युवकाचे डोळे हिरव्या रंगाचे असले पाहिजेत. एकवेळा सहा फूट उंचीची अट पूर्ण करु शकणारे युवक भारतात बऱ्यापैकी संख्येने सापडतील, पण हिरव्या डोळ्यांची अट पूर्ण करता येणे महाकठीण आहे. तिसरी अट अशी की त्याला पाश्चात्य संगीत आणि नृत्याची आवड असावयास हवी. चौथी अट ही की त्याने रशिया या देशावर प्रेम केले पाहिजे आणि अर्थातच या युवतीवरही. ही पोस्ट आणि विशेषत: या युवतीचे साजशृंगारातील छायाचित्र पाहून मनात लाडू फुटलेल्या युवकांचा पुढे तिच्या अटी वाचून भ्रमनिरास झाला असणे स्वाभाविक आहे. तरीही तिच्या सर्व अटी पूर्ण करणारा कोणी असेलच तर त्याला ही संधी उपलब्ध आहे, हे निश्चित.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article