For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शायना मणीमुथूला कांस्यपदक

06:06 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शायना मणीमुथूला कांस्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताची महिला बॅडमिंटनपटू शायना मणीमुथूने प्रतिष्ठेच्या डच कनिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत शायनाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या यीनकडून हार पत्करावी लागली.

आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविणाऱ्या शायना मणीमुथूने डच बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या यीनने शायनाचा 21-17, 21-8 अशा सरळ गेम्समध्ये 35 मिनिटांत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत शायनाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारताना तृतिय आणि 13 व्या मानांकीत बॅडमिंटनपटूंना पराभूत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.