For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सनी लियोनीसोबत दिसणार शत्रुघ्न सिन्हा

06:27 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सनी लियोनीसोबत दिसणार शत्रुघ्न सिन्हा

वेबसीरिजद्वारे ओटीटीवर करणार पदार्पण

Advertisement

मोठ्या पडद्यासोबत आता ओटीटीची क्रेझही वाढली आहे. मोठमोठे कलाकार आता डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळू लागले आहेत. आता दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव यात जोडले गेले आहे. शत्रुघ्न सिन्हा लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. त्यांची पहिली वेबसीरिज ‘गँग्स ऑफ गाजियाबाद’चा फर्स्ट लुक समोर आला आहे. यात अभिनेत्री सनी लिओनीसोबत सिन्हा दिसून येत आहेत.

दिग्दर्शक नागेंद्र चौधरी यांच्या गँग्स ऑफ गाजियाबाद या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजच्या पोस्टरमध्ये शत्रुघ्न सिन्हा हातात बंदुक पकडून असल्याचे दिसते. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत सनी लियोनी, आशुतोष राणा, माहिरा शर्मा, मुकेश तिवारी, जतिन शर्मा आणि अभिमन्यू सिंह यासारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Advertisement

या सीरिजची कहाणी 90 च्या दशकातील गाजियाबादच्या स्थानिक टोळीयुद्धावर आधारित असल्याचे समजते. या क्राइम थ्रिलर सीरिजची प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. तर लवकरच याचा ट्रेलर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.