शतावधानी गणेश यांना पद्मभूषण
कर्नाटकातील सात जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी/ बेंगळूर
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात असाधारण सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांना भारत सरकारकडून दरवषी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात कला क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शतावधानी आर. गणेश यांना पद्मभूषण तर अन्य क्षेत्रात सेवा दिलेल्या सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या केएलई संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. प्रभाकर कोरे, समाजसेवक अंकेगौडा एम., समाजसेविका एस. जी. सुशिलम्मा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल शशि शेखर वेंपती, विज्ञान आणि अभियांत्रिकीतील सेवेबद्दल शोभा वेंकटेश अय्यंगर, वैद्यकीय सेवा डॉ. सुरेश हनगवाडी आणि वाणिज्य व उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल टी. टी. जगन्नाथन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले जाणार आहे.