For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शशिकांतचे भालाफेकीत सुवर्णवेध

10:55 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
शशिकांतचे भालाफेकीत सुवर्णवेध
Advertisement

दसरा क्रीडा महोत्सवात केला नवा विक्रम

Advertisement

बेळगाव : म्हैसूर येथे कर्नाटक राज्य सरकार आयोजित दसऱ्यानिमित्त सीएम चषक अॅथलेटिक स्पर्धेत बेळगाव डीवायईएसच्या शशिकांत पाटीलने भालाफेक स्पर्धेत 74.74 मी.ची फेक करुन नवीन दसरा विक्रम नोंदविला. ऑलिम्पिकच्या पात्रतेची मर्यादा थोडक्यात हुकली. म्हैसूर येथे चामुंडी विहार स्टेडियमवर प्रतिवर्षाप्रमाणे दसरा महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत अॅथलेटिक विभागातील भालाफेक स्पर्धेत डीवायईएसच्या शशिकांत पाटीलने दुसऱ्या फेरीत 74.74 मी.ची फेक करुन दसरा महोत्सवाचा नवीन विक्रम नोंदविला आहे. हा विक्रम नेंदविणारा शशिकांत पाटील हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिंचवाड गावचा रहिवासी आहे.

यापूर्वी झालेल्या साऊथ इंडियन अॅथलेटिक स्पर्धेत शशिकांत पाटीलने 67.87 इतकी फेक करुन सुवर्णपदक पटकाविले होते. पण 20 वर्षांखालील राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेमध्ये आपला वैयक्तिक 70.02 इतकी फेक करुन विक्रम नोंदविला होता. त्याचप्रमाणे 22 वर्षांखालील ज्युनिअर ऑल इंडिया स्पर्धेत 67.72 इतकी फेक करुन सुवर्णपदक पटकाविले होते. शशिकांत  हा खानापूर तालुक्यातील चिंचवाड गावातील शेतकरी  कुटुंबातील आहे. दहावीनंतर एका स्पर्धेत शशिकांतने केलेल्या भालाफेकच्या स्पर्धेत उत्तम फेक केली होती. त्यावेळी युवजन क्रीडा खात्याचे अॅथलेटिक प्रशिक्षक संजीवकुमार नाईक यांनी शशिकांतला हेरले व त्यांनी युवजन क्रीडा खात्याच्या वसतिगृहात त्याची निवड करुन सराव सुरू केला. सरावावेळी शशिकांतने 52 मीटरची पर्यंतचे अंतर कापत असतानाच काही वर्षांतच त्याने 65 ते 70 मीटरच्या आंतरची मजल मारली. त्यामुळे प्रशिक्षकांकडून त्याच्याकडे अपेक्षा वाढल्या. या अपेक्षेला पुरक व समाधान असे यश तो मिळवत होता.

Advertisement

फिटनेस प्रशिक्षक बसवराज भुसन्नावर यांनी शशिकांतवर नियमीत सराव व तांत्रिकदृष्ट्या सुधारण्यासाठी त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याचेच फलीत दसरा स्पर्धेत उमटले. या स्पर्धेत पहिली फेक 68.17 मी.ची केली होती. पण दुसरी फेक त्याने 74.74 मी.ची करुन नवीन विक्रम स्थापला. तिसरी फेक 72.21, चौथी फेक 72.87, पाचवी फेक 71.88 तर सहावी फेक 72.44 मी. इतकी केली. शशिकांत हा ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी लागणारे अंतर थोडक्यात हुकले आहे. त्याने या केलेल्या फेकीनंतर पुढील उद्दिष्ट ऑलिम्पिक पात्रतेसाठी करणार असून निराज चोप्राची प्रेरणा घेवून आपणही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. त्याची सुरुवात या दसरा स्पर्धेत दाखविल्याने त्याचे प्रशिक्षक संजीवकुमार नाईक यांची जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात बेळगावचा निरज चोप्रा आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकण्याची आशा त्यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली. त्याला अॅथलेटिक प्रशिक्षक संजीवकुमार नाईक व बसवराज भुसन्नावर यांचे मार्गदर्शन तर युवजन क्रीडा अधिकारी श्रीनिवास बी., मधूकर देसाई व इतर सहकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Tags :

.