For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीत भाजप मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून सादर करेल : शशी थरूर

07:17 PM Dec 29, 2023 IST | Kalyani Amanagi
लोकसभा निवडणुकीत भाजप मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून सादर करेल   शशी थरूर
Advertisement

भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मोदी 22 जानेवारीला अयोध्येत 'राम मंदिर' आणि 14 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये 'BAPS हिंदू मंदिर' चे उद्घाटन करणार आहेत, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. असा उपरोधिक टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लगावला आहे.

Advertisement

लोकसभा निवडणूक ही 'हिंदुत्व' विरुद्ध 'लोककल्याण' अशी लढाई होत आहे. आर्थिक विकास, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करणे आणि प्रत्येक भारतीयाच्या खिशात डिस्पोजेबल उत्पन्न टाकणे या प्रश्नांवर चर्चेची गरज असल्याचे ते म्हणाले. असही काँग्रेस खासदार थरूर म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की 2009 मध्ये (PM) मोदींना गुजरात इंक.चे CEO म्हणून भारतीय मतदारांना विकले गेले, जे सर्व भारतीयांसाठी विकास घडवून आणणारे आर्थिक विकासाचे मूर्त स्वरूप आहे. पण, विनाशकारी नोटाबंदीनंतर ही कथा 2019 मध्ये संपली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याने मोदींना 'सार्वत्रिक निवडणुका'ला 'राष्ट्रीय सुरक्षा निवडणुकीत' बदलण्याची संधी दिली.या सगळ्यावरून प्रश्न पडतो, अच्छे दिनांचे काय झाले? एका वर्षात दोन कोटी नोकऱ्यांचे काय झाले? आर्थिक वाढीचे काय झाले ज्यामुळे सामाजिक-आर्थिक शिडीच्या तळाशी असलेल्यांना फायदा होईल? प्रत्येक भारतीयाच्या खिशात आणि बँक खात्यात डिस्पोजेबल उत्पन्न टाकण्याचे काय झाले?" माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, 'या प्रश्नांवर हिंदुत्व विरुद्ध लोककल्याण असे स्वरूप येणा-या निवडणुकीत चर्चा करावी लागेल.' अशी प्रतिक्रिया थरूर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.