अहान पांडेसोबत दिसणार शर्वरी वाघ
अली अब्बास जफरचा नवा चित्रपट
फिल्ममेकर अली अब्बास जफरने स्वत:च्या नव्या अॅक्शन-रोमान्स चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. त्याच्या या चित्रपटात अहान पांडे मुख्य भूमिकेत आहे. अहानचा मागील चित्रपट ‘सैयारा“ यशस्वी ठरला होता. तर अली अब्बास जफरच्या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत सुमारे एक महिन्याभर चालणार आहे.
अली अब्बास जफरने अहानसोबतचे छायाचित्र शेअर करत चित्रिकरण सुरू झाल्याची घोषणा केली. या चित्रपटात अहानची नायिका म्हणून शर्वरी वाघ झळकणार आहे. मे 2026 मध्ये चित्रपटाची टीम लंडन येथील चित्रिकरणासाठी रवाना होणार असून तेथे मोठ्या अॅक्शनदृश्यांचे चित्रिकरण पाच दिवसांपर्यंत चालणार आहे. अहानने या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेतली असून यात हँड-टू-हँड कॉम्बॅट आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण सामील आहे. हा चित्रपट त्याला ‘सैयारा“पेक्षा अत्यंत वेगळ्या अवतारात सादर करणार आहे.
कधी होणार प्रदर्शित?
निर्माते जुलै महिन्यापर्यंत याचे चित्रिकरण पूर्ण करण्याची योजना आखत असून पुढील वर्षी तो प्रदर्शित करण्याचा विचार आहे. या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे हा खलनायकाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्यने ‘निशांची“द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.