‘लुका छुपी 2’मध्ये शर्वरी वाघ
वरुण धवनसोबत झळकणार
कार्तिक आर्यन आणि क्रीति सेनॉनचा 2019 मध्ये सुपरहिट चित्रपट लुका छुपी प्रेक्षकांना अत्यंत पसंत पडला होता. आता या चित्रपटाचा सीक्वेल तयार केला जाणार आहे. यावेळी कार्तिक आर्यनची जागा वरुण धवन घेणार आहे. तर क्रीति सेनॉनच्या जागी शर्वरी वाघची निवड करण्यात आली आहे.
हा चित्रपट सुपरनॅचरल ट्विस्टसोबत येणार आहे. मॅडॉक फिल्म्स या प्रोजेक्टला फ्रँचाइजीत रुपांतरित करण्याच्या तयारीत आहे. लुका छुपी 2 ची कहाणी पहिल्या भागापेक्षा वेगळी असणर आहे. वरुण आणि शर्वरीने पटकथेला होकार दर्शविला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन यावेळी लक्ष्मण उतेकर करणार नाहीत. तर त्यांचे सहकारी ही जबाबदारी सांभाळणार आहेत. तर उतेकर हे सहनिर्माते म्हणून चित्रपटाशी जोडले जाणार आहेत. लुका छुपी या चित्रपटात छोट्या शहरातील लिव्ह इन रिलेशनशिपची कहाणी मजेशीर स्वरुपात सादर करण्यात आली होती. आता लुका छुपी 2 मध्ये सुपरनॅचरल छटेसह नवी कहाणी प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. वरुण आणि शर्वरीची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
वरुण धवनकडे बॉर्डर 2, सनी संस्कारी की तुलसी कुमारी, हाय जवानी तो इश्क होना है यासारखे चित्रपट आहेत. तर शर्वरी ही अल्फा चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसून येणार आहेत. तसेच इम्तियाज अलीच्या एका चित्रपटात काम करत आहे.