For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिलजीतच्या चित्रपटात शर्वरी

06:41 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिलजीतच्या चित्रपटात शर्वरी
Advertisement

‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी जारी केला आहे. या चित्रपटाद्वारे इम्तियाज अली पुन्हा एकदा प्रेमाच्या वेदनेची कहाणी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार असल्याचे हा ट्रेलर पाहून स्पष्ट होते. या चित्रपटात दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. तर मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ यात नायिकेच्या भूमिकेत आहे.

Advertisement

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेम, तडफड आणि एक अपूर्ण कहाणीची झलक दिसून येते. या कहाणीची सुरुवात दिलजीत आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेने होते. नसीर यांची भूमिका स्वत:च्या अखेरच्या घटका मोजत असून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याचे सांगणे अन् तडफड कुणीच समजू शकत नाही. अखेरीस दिलजीत साकारत असलेली भूमिका ही जबाबदारी स्वीकारते. मग  कहाणी फ्लॅशबॅकमध्ये जाते, ज्यात वेदांग रैना आणि शर्वरी वाघच्या भूमिकेची प्रेमकहाणी दाखविली जाते. या प्रेमकहाणीचा अंत वेदनादायी दाखविण्यात येतो. अखेर दिलजीत, नसीरुद्दीन, वेदांग आणि शर्वरी साकारत असलेल्या भूमिका परस्परांमध्ये कशा जोडल्या जातात हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

इम्तियाज अलीकडून दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. तर या चित्रपटासाठी इरशाद कामिल यांनी गीतलेखन केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्यही रहमान यांच्या संगीताच्या जादूची जाणीव होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.