यशराजच्या चित्रपटात शर्वरी-अहान
शर्वरी वाघ आणि अहान पांडे यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरचा नवा अॅक्शन-रोमान्स चित्रपट स्वीकारला आहे. अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटात अहान आणि शर्वरी ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अहानचा ‘सैय्यारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. तर शर्वरी देखील 100 कोटी कमाविणाऱ्या ‘मुंज्या’ चित्रपटाची नायिका होती. उत्तम अभिनय प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचू शकतो हे दोघांनीही सिद्ध केले आहे.
यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात आता अहान आणि शर्वरी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटाद्वारे जफर हा 9 वर्षांनी यशराज फिल्म्ससोबत पुन्हा काम करणार आहे. हा एक अॅक्शन-रोमान्स चित्रपट असेल.
आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांनी यापूर्वी 4 चित्रपट एकत्र निर्माण केले आहेत. यात ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘गुंडे’, ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ सामील आहेत. तर शर्वरी आणि अहान यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.