For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न

06:45 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न
Advertisement

ड्रिलिंग अयशस्वी, आता बोगदा कापून बचावाची तयारी, सातव्या दिवशीही बचावकार्य सुरूच 

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

उत्तराखंड येथे सिल्क्यारा बोगद्यात दिवाळीच्या दिवशी (12 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजता बांधकामाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळल्यामुळे 41 मजूर अडकले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही. त्यांच्या बचावासाठीचे प्रयत्न दिवसेंदिवस कठीण होत आहे. कधी डोंगराला तडे जात असल्यामुळे तर कधी यंत्र नादुरुस्त झाल्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

कामगारांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेपुढे सातत्याने आव्हाने निर्माण होत आहेत. शुक्रवारी इव्हॅक्मयुएशन बोगदा बांधण्यासाठी पाईप टाकत असताना अचानक बोगद्याच्या आतून डोंगर कोसळल्याचा मोठा आवाज आला. त्यामुळे बचाव पथकातील सदस्य आणि इतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर बचाव मोहिमेसह बोगद्यातील काम तातडीने थांबवण्यात आले. आता बोगद्याचा काही भाग कापून अडकलेल्या कामगारांची सुटका करता येईल काय? याची चाचपणी केली जात आहे.

बोगद्याच्या आत डोंगर कोसळल्याच्या वृत्ताला उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक ऊहेला यांनी दुजोरा दिला. एनएचआयडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी बोगद्याच्या आत डोंगर कोसळल्याचा आवाज ऐकला आहे. आवाज ऐकून तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि बचावकार्यात गुंतलेल्या टीमने याबाबत माहिती दिली होती, असे सांगण्यात आले.

या घटनेनंतर बचावकार्य कसे राबवायचे याचा निर्णय घेण्यासाठी तज्ञांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर सध्या बोगद्यातील पाईप टाकण्याचे काम बंद करण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्थेचा विचार केला जात आहे. नजिकच्या काळात जिकिरीने परिस्थिती हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर बोगद्याच्या आत असलेल्या बचाव क्षेत्रात ह्यूम पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी बोगद्याच्या आत वाहनांमधून मोठ्या प्रमाणात ह्यूम पाईप्स नेण्यात आले. ह्यूम पाईप सिमेंट आणि काँक्रीटपासून बनवलेले असून ते मोठ्या नाल्यांच्या प्रवाहासाठी वापरले जातात. त्यांचा व्यास 1800 मिमीपेक्षा जास्त आहे.

नवीन पाईप टाकून अन्नपुरवठ्याचे प्रयत्न

सिल्क्मयारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी पाईप टाकले जात असल्याने कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्यही वाढत आहे. बोगद्यात आणखी 125 मिमी व्यासाचा पाईप टाकला जात आहे, जेणेकरून कामगारांना खाद्यपदार्थांचा पुरवठा योग्य प्रकारे करता येईल. सध्या बोगद्यात आधीच टाकलेल्या 80 मिमी व्यासाच्या डेनेज पाईपद्वारे कामगारांना अन्नपदार्थ, ऑक्सिजन आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.

कामगार सुरक्षित असल्याची माहिती

बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सध्या सुरक्षित आहेत. त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. वीजपुरवठाही सुरळीत आहे. अन्नपदार्थ आणि ऑक्सिजनही नियमित पाठवला जात असल्याचे उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक ऊहेला यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.