शार्प इंटरप्राईजेस, के. आर. शेट्टी किंग्ज विजयी
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारच्या सामन्यात शार्प इंटरप्राइजेस व के. आर. शेट्टी किंग्स संघाने शानदार विजय नोंदवले. जिमखाना मैदानावर आजच्या पहिला सामन्यात शार्प इंटरप्राईजेस संघाने, जेवर गॅलरी डायमंड संघाला पराभवाचा धक्का देत या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंद केला. प्रथम फलंदाजी करताना जेवर गॅलरी डायमंड संघाने 25 षटकात पाच बाद 156 धावा केल्या. सचिन तलवार आठ चौकारांसह 64 धावा. विवान भूसद चार चौकारांसह 51 धावा केल्या. शार्प इंटरप्राईजेस तर्फे समर्थ तलवारने दोन तर कनिष्क वेर्णेकर व श्रेयांस पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शार्प इंटरप्राईजेस संघाने 25 षटकात 6 बाद 157 धावा जमवत हा 48 वा सामना जिंकला व या स्पर्धेतील आपले आव्हान टिकुन ठेवले. अक्षय बलीगर पाच चौकार 36 धावा, ओजस गडकरी तीन चौकार 37 धावा, तेजस गौरव दोन चौकारसह 25 धावा जमविल्या. जेवर गॅलरीतर्फे विवान भूसद, कृष्णा पाटील, मोहम्मद हमजा, व यश सन्मानी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे बसवराज मोतीमठ, विकास देसाई व स्पर्धा पुरस्कर्ते चंदन कुंदरनाड यांच्या हस्ते सामनावीर तेजस गुरव इम्पॅक्ट खेळाडू ओजस गडकरी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग संघचा मॅक्स आनंद अकादमी संघाचा सहा गड्याने पराभव करत स्पर्धेत चुरश निर्मान केली. आनंद अकादमी संघाने 22 षटकात केवळ 74 धावा केल्या. त्यात शिवम काटवने 17 धावा व राजवीरने 10 धावा नोंदविल्या. के. आर. शेट्टी किंग्सतर्फे दैविक मूगबस्थने 3 गडी बाद केले. स्वयंम खोतने 2 गडी बाद केले. वरदराज पाटील, आयुष प्रभू, आजगावकर, यश चौगुले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी किंग्स संघाने 18.3 षटकात 4 गडीबाद 75 धावांचे विजयाचे उद्दिष्ट गाठत हा सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात श्रुजनगौडा एस. एफ. 6 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या. मॅक्स आनंद अकादमीतर्फे राजवीर व अद्वैत चव्हाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे सचिन पाचापुरे मंजुनाथ मूगबस्त व विनायक पवार यांच्या हस्ते सामनावीर श्रुजनगौडा एस एफ व इम्पॅक्ट खेळाडू दैविक मूगबस्त यांना चषक देण्यात आला.