For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या घरातून धारदार-घातक शस्त्र जप्त

06:30 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या घरातून धारदार घातक शस्त्र   जप्त
Advertisement

तलवारी, वाघनखे, विळा, कोयता आदींचा समावेश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांच्या सूचनेवरून बेळगावसह संपूर्ण राज्यात काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या घरांवर छापे टाकून तपासणी करण्यात येत आहे. बेळगावातही शुक्रवारी सुमारे 108 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत तलवारी, वाघनखे, विळा, कोयते जप्त करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व एसीपी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

मार्केट पोलिसांनी ताशिलदार गल्ली येथील गौरंग ऊर्फ गौरव जगन्नाथ गेंजी (वय 33) याच्याजवळून दोन तलवारी व दोन वाघनखे जप्त केली आहेत. तर भांदूर गल्ली येथील श्रीधर ऊर्फ सिद्धू दिलीप गेंजी (वय 31) याच्या घरातून विळा जप्त करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी विद्यानगर-अनगोळ येथील श्रवण संतोष शिरवईकर याने केए 22 एचजे 0873 क्रमांकाच्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेला कोयता जप्त केला आहे.

हिरेबागेवाडी पोलिसांनी जनता कॉलनी, बस्तवाड येथील हसनसाब गौसमोदीन मुल्ला (वय 45) याला कोयता घेऊन फिरताना ताब्यात घेऊन त्याच्याजवळून कोयता जप्त केला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या कारवाईत भाग घेतलेल्या अधिकारी व पोलिसांचे कौतुक केले आहे.

बेकायदा दारूसाठा जप्त

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी देवाप्पा बाळाप्पा लोकुरे (वय 50) राहणार जाधव गल्ली, नंदिहळ्ळी याला अटक करून त्याच्याजवळून 5 लिटर 650 मिली बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या निवासस्थानांवर छापे टाकून तपासणी करताना त्याच्याजवळ सुमारे साडेतीन हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा आढळून आला आहे.

Advertisement
Tags :

.