‘मेडिकल ड्रीम्स’मध्ये शरमन जोशी
टीव्हीएफ या प्लॅटफॉर्मवर आकर्षक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कहाण्यांचे सादरीकरण केले जाते. आता टीव्हीएफ पुन्हा एकदा नवा आणि प्रेरणादायी शो घेऊन आला आहे. या शोचे नाव ‘मेडिकल ड्रीम्स’ आहे. या शोमध्ये नीटची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याची संघर्षयात्रा दाखविण्यात आली आहे. या शोला टीव्हीएफचा लोकप्रिय चॅनेल ‘गर्लीयापा’ अंतर्गत प्रदर्शित करण्यात आले आहे. मेडिकल ड्रीम्समध्ये तीन नीटची तयारी करणारे विद्यार्थी श्री, ध्वनि आणि समर्थची कहाणी दाखविण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंबातून आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. देशाच्या सर्वात कठिण परीक्षांपैकी एक नीटमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. या कठिण प्रवासात या विद्यार्थ्यांना सुब्रत सिन्हा हा मार्गदर्शन करत असतो, जो एलन कोचिंगमध्ये बायोलॉजीचा शिक्षक आहे. त्याची प्रेरणादायी शिक्षणशैली विद्यार्थ्यांना प्रेरित करत असते. ही एक कमिंग-ऑफ-एज कहाणी असून ती विद्यार्थ्यांना स्वत:च्या स्थितींशी तडजोड करण्याऐवजी मेहनत अन् निष्ठेने स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरित करते. याचबरोबर टीव्हीएफने अमेझॉन एमएक्स प्लेयरच्या इव्हेंटमध्ये आणखी तीन शोंची घोषणा केली आहे. हाफ सीए सीझन2, हूज योर गायनेक सीझन 2 आणि सिक्सर सीझन 2 टीव्हीएफकडून लवकरच प्रदर्शित केले जाणार आहेत.