शरीफ यांचाही झाला असता मृत्यू
भारत-पाकिस्तान संघर्षासंबंधी ट्रंप यांचा नवा दावा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
गेल्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ घातलेले युद्ध माझ्या प्रयत्नांमुळेच थांबले, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा केले आहे. ते मंगळवारी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहासमोर भाषण करीत होते. हे युद्ध रोखल्यामुळे जवळपास साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती मला पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी दिली. या युद्धात शरीफ यांचाही मृत्यू होऊ शकला असता, अशीही मांडणी ट्रंप यांनी केली आहे.
माझ्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात मी जगातील आठ युद्धे थांबविली आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध होण्याची शक्यता होती. माझ्या प्रयत्नांच्यामुळेच ही शक्यता मावळली. मी मधे पडलो, म्हणून असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या लोकप्रतिधिगृहासमोरच्या प्रथम भाषणात केले आहे. आपल्या जवळपास वर्षभराच्या कार्यकाळातील कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी त्यांच्या या भाषणात लोकप्रतिनिधींसमोर सादर केला आहे.
कोणती युद्धे थांबविली...
आपण कोणती युद्धे थांबविली, याची माहितीही ट्रंप यांनी सादर केली. इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथियोपिया, भारत आणि पाकिस्तान, सर्बिया आणि कोसोव्हो, रवांडा आणि डेमॉव्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, अर्मेनिया आणि अझरबैजान, तसेच कंबोडिया आणि थायलंड अशी युद्धे माझ्यामुळे थांबली असून जागतिक शांततेला मी मोठाच हातभार लावला आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ट्रंप यांनी त्यांच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या भाषणात केले.
सुधारली अमेरिकेची अर्थव्यवस्था
आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असून आपल्या आर्थिक धोरणांचा लाभ अमेरिकेला आगामी बरीच वर्षे मिळत राहणार आहे. माझ्या धोरणांमुळे