महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

झोमॅटोचे समभाग तेजीवर स्वार

06:25 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समभाग 4 टक्के वाढीसह उच्चांकावर : गुंतवणूकदारांकडून खरेदीवर भर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या झोमॅटो कंपनीचे समभाग सलग दुसऱ्यादिवशी तेजीत असताना पाहायला मिळाले. एवढेच नाही तर कंपनीच्या समभागाने सर्वकालीक उच्चांक गाठण्यामध्ये यश मिळविले.

शुक्रवारच्या सत्रामध्ये झोमॅटोचा समभाग सलग दुसऱ्यादिवशी वधारलेला दिसला. 4.80 टक्के इतका सम     भाग वाढत 173 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीने ही सर्वोच्च पातळी शुक्रवारी गाठली होती. या आधीच्या म्हणजे गुरुवारच्या सत्रामध्ये झोमॅटोचे समभाग 165 रुपयांवर बंद झाले होते.

200 रुपयांवर पोहचणार?

गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पाहता हा समभाग 200 टक्के इतका दमदार वाढला आहे. सदरच्या समभागाचा भाव नजीकच्या काळामध्ये 200 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा तज्ञांचा विश्वास आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या या समभागाच्या खरेदीसाठी उत्सुक दिसून आले आहेत.

व्यवसायात चमक

झोमॅटोने 31 डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 138 कोटी रुपये निव्वळ नफा कमाविला होता. या आधीच्या वर्षामध्ये समान अवधीत कंपनीला 347 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अलीकडच्या काळामध्ये फूड डिलिव्हरीच्या व्यवसायामध्ये झोमॅटोने चांगली चमक दाखवली आहे. खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्येसुद्धा प्रगती दिसली आहे. याचाच परिणाम समभागावर पहायला मिळतो

आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article