चहा कंपन्यांचे समभाग 10 टक्क्यांनी मजबूत
बॉम्बे बर्माच्या समभागांमध्ये 16 टक्क्यांनी वाढ
मुंबई :
चहा उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये बुधवारी वाढ झाली. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, मॅक्लिओड रसेल, जयश्री टी अँड इंडस्ट्रीज आणि रसेल इंडिया सारख्या प्रमुख चहा कंपन्यांचे शेअर्स 10 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. खरेतर, आसाम आणि इतर चहा उत्पादक प्रदेश कापणीच्या हंगामात पूर आणि उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित होतात, ज्यामुळे उत्पादन कमी होते. परिणामी चहाचे दर आणि सर्वच चहा उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
चहा उत्पादक गेल्या 10 वर्षांपासून वाढत्या उत्पादन खर्च आणि चहाच्या किमतीत झालेल्या किरकोळ वाढीमुळे त्रस्त आहेत. आसाममध्ये सुरू असलेल्या पुरामुळे उत्पादनात घट होत आहे. भारतीय चहा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रभात बेजबोरुआ म्हणाले, ‘अत्यंत प्रतिकुल हवामानाच्या घटनांमुळे चहाच्या उत्पादनात घट होत आहे. मे महिन्यातील अतिउष्णतेमुळे आणि त्यानंतर आसाममध्ये सुरू असलेल्या पुरामुळे उत्पादनात घट होत आहे.’
बॉम्बे बर्माचा समभाग सर्वाधिक तेजीत
बॉम्बे बर्माचा शेअर 16 टक्क्यांनी वाढून 2,344 रुपयांवर बंद झाला बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनचा शेअर 16 टक्केपेक्षा जास्त वाढून 2,344 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, मॅक्लिओड रसेलचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 32.24 रुपयांवर पोहोचला आणि रसेल इंडियाचा शेअर 9.04 टक्के वाढीसह 624 रुपयांवर बंद झाला. जयश्री टीचे समभाग 8.18 टक्के वाढून 122 रुपयांवर पोहोचले. जयश्री ही जगातील तिसरी सर्वात
मोठी चहा उत्पादक कंपनी आहे. याशिवाय बी अँड ए लिमिटेड, जेम्स वॉरेन, कॅन्को टी आणि टायरोन टी कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.मे मध्ये उत्पादनात 30 टक्केपेक्षा जास्त घट मे महिन्यात भारतातील चहाचे उत्पादन वर्षापूर्वीच्या तुलनेत 30 पेक्षा जास्त घसरून 90.92 दशलक्ष किंवा 9.09 कोटी किलोग्रॅमवर आले आहे. अतिउष्णता आणि अल्प पावसामुळे गेल्या दशकभरातील ही या महिन्यातील नीचांकीपातळी आहे.
20 लाख पुराने प्रभावित
देशातील निम्म्याहून अधिक चहाचे उत्पादन ईशान्येकडील आसाम राज्यात होते. आसाममध्ये जुलैमध्ये नदीला आलेल्या भीषण पुरामुळे 20 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.एप्रिलमध्ये उष्णतेमुळे उत्पादन कमी होते. कलकत्ता टी ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव कल्याण सुंदरम यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये चांगली मागणी असतानाही कडक उन्हामुळे उत्पादन घटल्याने चहाच्या किमती वाढू लागल्या आहेत.
चहाच्या दरात झाली वाढ
याचदरम्यान चहाच्या दरात मात्र वाढ करण्यात आली आहे. चहा
मंडळाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात सरासरी चहाची किंमत 217.53 रुपये प्रति किलो
झाली, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के जास्त आहे.
जुलैमध्ये पुरामुळे आसाममधील अनेक जिह्यांमध्ये चहा काढणी कमी
जोरहाटमधील एका चहाच्या मळ्याच्या मालकाने सांगितले की, जूनमध्ये चांगल्या पावसामुळे चहाचे उत्पादन चांगले झाले होते, परंतु जुलैमध्ये पुन्हा पूर आल्याने आसाममधील अनेक जिह्यांमध्ये चहाची काढणी कमी झाली आहे. पुरामुळे कामगारांना मळ्यात येता आले नाही.
2024 मध्ये उत्पादनात 10 कोटी किलोने घट?
2023 मध्ये भारताने 1.39 अब्ज किंवा 139 कोटी किलोग्रॅम चहाचे विक्रमी उत्पादन केले, परंतु 2024 मध्ये मात्र उत्पादन सुमारे 100 दशलक्ष किंवा 10 कोटी किलोग्रॅमने कमी होऊ शकते.