महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्विगीचे समभाग 420 रुपयांवर सुचीबद्ध

06:33 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

500 कर्मचारी बनले करोडपती :  प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची इश्यू किंमत 289 प्रति शेअर

Advertisement

मुंबई :

Advertisement

स्विगी लिमिटेड आणि एसीएमइ सोलार होल्डींग्स लिमिटेडचे समभाग बुधवारी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाले आहेत. स्विगीचे शेअर्स एनएसईवर 420 रुपयांवर सूचीबद्ध झाले, इश्यू किमतीपेक्षा 7.69 टक्क्यांनी वाढले. तर समभाग बीएसई वर 412 वर सूचीबद्ध झाले, त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 5.64 टक्क्यांनी अधिक किंमतीला. त्याची इश्यू किंमत 390 प्रति शेअर होती. त्याच वेळी, एसीएमइ सोलर होल्डिंग्सचे शेअर्स एनएसईवर इश्यू किंमतीपेक्षा 13.15 टक्क्यांनी खाली येत 251 वर सूचीबद्ध झाले. बीएसईवर शेअर 259 वर सूचीबद्ध झाला, त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 10.38 टक्क्यांनी खाली आला होता.

प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची इश्यू किंमत 289 प्रति शेअर होती. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर एसीएमइ सोलर होल्डिंग्स लिमिटेडचा लिस्टिंग समारंभही आयोजित करण्यात आला होता.

स्विगी लिमिटेड : इश्यू 11,327.43 कोटी

स्विगी लिमिटेड आयपीओ एकूण 11,327.43 कोटीचा होता. यासाठी, कंपनीने 4,499 कोटी किमतीचे 11,53,58,974 नवीन शेअर्स जारी केले. तर, कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांनी 6,828.43 कोटी किमतीचे 17,50,87,863 शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे विकले.

या यादीसह 500 कर्मचारी करोडपती

स्विगीच्या लिस्टमुळे या कंपनीचे जवळपास 500 कर्मचारी करोडपती झाले आहेत. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना सूचीबद्ध होण्यापूर्वी एका विशेष योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कंपनीचे शेअर्स जारी करण्यात आले होते. स्विगीने 2015, 2021 आणि 2024 मध्ये तीनदा एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम लाँच केली होती. इएसओपी अंतर्गत, 4,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये छोटे स्टेक देण्यात आले होते.

स्विगीच्या महसूलात 36 टक्क्यांची वाढ

स्विगीचा महसूल 2024 मध्ये 36 टक्क्यांनी वाढून 11,247 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 8,265 कोटी रुपये होता. त्याचवेळी, कंपनीने आपला तोटा देखील 44 टक्क्यांनी कमी केला आणि तो आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2,350 कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षी 4,179 कोटी रुपये होता. कंपनीला खर्च नियंत्रणात ठेवून तोटा कमी करण्यास मदत झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article