For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलर कंपन्यांचे समभाग घसरणीत

06:29 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोलर कंपन्यांचे समभाग घसरणीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

बुधवारी शेअरबाजारात सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर संक्रांत आली. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या सौर उत्पादनांवर 125 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केल्याने त्याचे परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर दिसले. वारी एनर्जी, विक्रम सोलार व प्रीमीयर एनर्जी यांचे जवळपास 15 टक्क्यांपर्यंत खाली आलेले होते. व्यवहारादरम्यान वारीचा समभाग 11 टक्के, प्रीमियरचा समभाग 5 टक्के व विक्रम सोलारचा समभाग 4 टक्के इतका घटला होता. सोलार उत्पादनांवर भारतात कंपन्यांना अनुदान मिळते तेव्हा त्यांची उत्पादने अमेरिकेत स्वस्त मिळतात, असा दावा अमेरिकेने केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.