पेटीएमचे समभाग नीचांकी स्तरावर घसरले
07:00 AM May 13, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : खडिजिटल देवाणघेवाणीच्या व्यवहारात कार्यरत पेटीएमला शेअर बाजारात पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पेटीएमचे समभाग बीएसईवर गुरुवारी 3 टक्के घसरत 517 रुपयांवर व्यवहार करताना दिसले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक नीचांकी स्तर असल्याचे सांगितले जात आहे. सलग 6 सत्रात कंपनीचे समभाग हे घसरणीतच राहिले असून 14 टक्क्यापर्यंत घसरण राहिली आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीचे समभाग 26 टक्के इतके घसरले आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article