For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेटीएमचा समभाग 14 टक्के घसरला

06:34 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेटीएमचा समभाग 14 टक्के घसरला
Advertisement

मुंबई :

Advertisement

वन 97 कम्युनिकेशन्सची सहकारी कंपनी पेटीएमचे समभाग शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीत असताना दिसले आहेत. बुधवारीही समभागावर लोअर सर्किट लागले असल्याची माहिती आहे. तसेच गेल्या तीन दिवसात पाहता हा समभाग 14 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

बुधवारी कंपनीचा समभाग 317 रुपयांवर सर्वकालीक नीचांकावर घसरला होता. बुधवारी पुन्हा बीएसईवर समभागावर 5 टक्केचे लोअर सर्किट लागले होते. याआधी कंपनीच्या समभागाचा भाव 16 फेब्रुवारी 2014 रोजी 318 या नीचांकावर होता. कंपनीचे सीओओ भावेश गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीचा समभाग बाजारात हेलकावे खाताना दिसला आहे. तीन दिवस हा समभाग घसरणीतच राहिला होता. यांच्याच पेटीएम पेमेंटस् बँकेवर काही महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते.

Advertisement

राजीनामा देणारे तिसरे अधिकारी

गेल्या काही महिन्यात कंपनीतून बाहेर पडणारे गुप्ता हे तिसरे अधिकारी ठरले आहेत. लवकरच कंपनी तिमाहीचा निकाल जाहीर करणार असून यापूर्वीच गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. शेअरबाजारात पाहता कंपनीचा समभाग गेल्या तीन दिवसांच्या सत्रात 14 टक्क्यापर्यंत खाली घसरलेला आहे. 20 ऑक्टोबर 2023 ला कंपनीच्या भावाने 998 रुपयांची उच्चांकी झेप घेतली होती.

Advertisement
Tags :

.