For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओरिएंट टेक्नालॉजीचा समभाग 290 वर सुचीबद्ध

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओरिएंट टेक्नालॉजीचा समभाग 290 वर सुचीबद्ध
Advertisement

इश्यू किंमत 206 रुपये : कंपनी आयटी सोल्यूशन्समध्ये कार्यरत

Advertisement

मुंबई : ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा समभाग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 290 रुपयावर सूचीबद्ध झाला आहे, जो 40.78 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर समभाग 288 वर सूचीबद्ध झाले, जे 39.81 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावची इश्यू किंमत 206 होती. हा आयपीओ 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. तीन ट्रेडिंग दिवसांत आयपीओ एकूण 154.84 पट सबक्राइब झाला. किरकोळ श्रेणी 68.93 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) 188.79 पट आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय)  श्रेणी 310.03 पट सबस्क्राइब झाला. कंपनीने 120 कोटी किमतीचे 5,825,243 नवीन शेअर्स जारी केले. तर, कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांनी 94.76 कोटी किमतीचे 4,600,000 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 936 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. ओरिएंट टेक्नॉलॉजीजने या इश्यूसाठी 195 रुपये ते 206 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता.

ओरिएंट टेक्नॉलॉजीजची स्थापना

Advertisement

ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेडची स्थापना 1997 मध्ये झाली. कंपनी माहिती तंत्रज्ञान सोल्युशन्स प्रदान करते. ओरिएंटचे मुख्यालय मुंबईत आहे.

Advertisement
Tags :

.