For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ओला ईव्ही’चे समभाग 76 रुपयांवर सुचीबद्ध

06:07 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ओला ईव्ही’चे समभाग 76 रुपयांवर सुचीबद्ध
Advertisement

मुंबई :

Advertisement

राष्ट्रीय शेअर बाजारात शुक्रवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा समभाग सुचीबद्ध झाला. कंपनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 76 च्या शेअर इश्यू किंमतीवर सूचीबद्ध झाली आहे. दरम्यान यावेळी, मुंबई शेअर बाजारात 75.99 रुपयांवर समभाग सूचीबद्ध झाला, जो त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 0.01 टक्क्यांनी खाली आहे. तथापि, नंतर बाजारात सत्रात शेअर 20 टक्क्यांच्या वाढीसह एनएसईवर 91 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

आयपीओ 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. तीन ट्रेडिंग दिवसांत आयपीओ एकूण 4.45 पट सबक्राइब झाला. रिटेल श्रेणी 4.05 पट ओव्हरसबक्राइब झाली, पात्र संस्थात्मक खरेदीदार 5.53 पट आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणी 2.51 पट इतकी आहे. ओला इलेक्ट्रिकच्या कारखान्यात दररोज 2000 हून अधिक स्कूटर्सची निर्मिती केली जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.