ओला इलेक्ट्रिकचे समभाग 20 टक्क्यांनी वधारले
वाढीसह समभाग 133 रुपयावर, समभाग 73 टक्क्यांनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओला इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्यानंतर शुक्रवारी समभागांमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तो 133 रुपयांवर पोहोचला आहे. ओलाच्या समभागांना ब्रोकरेज फर्म एचएसबीसीकडून प्रथम खरेदी रेटिंग देखील मिळाले आहे. ओलाने 15 ऑगस्ट रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक रोडस्टर लॉन्च केली. कंपनीने तिच्या वार्षिक कार्यक्रम ‘संकल्प 2024’ मध्ये रोडस्टर, रोडस्टर एक्स, रोडस्टर प्रो या 3 मॉडेल्ससह बाइक सादर केली.
समभाग 73 टक्क्यांनी वाढले
ओलाच्या शेअरची इश्यू किंमत 76 रुपये होती, तेव्हापासून शेअर सुमारे 73 टक्क्यांनी वाढला आहे. एचएसबीसीने खरेदी रेटिंगसह 140 रुपयांचे ध्येय निश्चित केले आहे. ओलाने जून तिमाहीत 49 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या आहेत.
देशातील मंदीची स्थिती, तीव्र स्पर्धा ही ओलासाठी आव्हाने असणार आहेत. पहिल्या तिमाहीत ओलाला 347 कोटी रुपयांचा तोटा झाला. ओला इलेक्ट्रिकने दोन दिवसांपूर्वी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एप्रिल-जून तिमाहीत ओलाला 347 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 267 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. म्हणजेच तूट 30 टक्क्यांनी वाढली आहे.