नायकाचे समभाग 6 टक्के वधारले
07:00 AM Sep 30, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी नायकाचे समभाग शेअरबाजारामध्ये गुरुवारी इंट्रा डे दरम्यान 6 टक्के वाढलेले दिसले. सदरची वाढ ही येत्या कालावधीमध्ये बोनस देण्यासंदर्भातील घोषणेमुळे दिसली असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी बीएसईवर 6 टक्के वाढत 1350 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीची संचालक मंडळाची 3 ऑक्टोबरला बैठक होणार असून त्यामध्ये बोनस देण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article