For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुथूट फायनान्सचे समभाग 4.3 टक्क्यांनी वधारले

06:33 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुथूट फायनान्सचे समभाग 4 3 टक्क्यांनी वधारले
Advertisement

चौथ्या तिमाहीत 1056 कोटीचा नफा

Advertisement

वृत्त्संस्था/ नवी दिल्ली

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात, एनबीएफसी क्षेत्रातील कंपनी मुथूट फायनान्सचे समभाग हे 4.3 टक्क्यांनी वाढून 1745 रुपयांच्या दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. गुरुवारी मुथूट फायनान्स कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले.

Advertisement

आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत मुथूट कंपनीने वर्षभराच्या आधारावर करानंतरच्या नफ्यात 17 टक्के वाढ नोंदवून  1056 कोटी रुपये इतका नफा प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत हा करानंतरचा नफा 903 कोटी रुपये होता. याशिवाय, कंपनीने वार्षिक आधारावर व्यवस्थापनाखालील एकत्रित कर्ज मालमत्तेत 25 टक्के वाढ नोंदवली असून ती 89079 कोटी रुपये झाली आहे. मजबूत वाढीसह वार्षिक आधारावर कर्ज मालमत्ता 12617 कोटी नोंदवली आहे.

स्टॉकची कामगिरी

मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअर कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 3 महिन्यात या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना 29 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या 1 वर्षात या समभागाने 51 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मुथूट फायनान्स स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1763 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1109 रुपये आहे.

Advertisement
Tags :

.