उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपन्यांचे समभाग घसरणीत
06:14 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
द्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूह कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या समभागांना सोमवारी लोवर सर्किट लागले होते. बाजारातील नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह 24 अन्य जणांना बाजारात बंदी घालण्यात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या समभागांना लोवर सर्किट लागले. रिलायन्स पॉवरचा समभाग 4.99 टक्के घसरत 32 रुपयांवर आला होता. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचा समभाग 4.93 टक्के घसरत 4.24 रुपयांवर आला होता. रिलायन्स कम्युनिकेशनचे समभागसुद्धा 4.92 टक्के घसरलेले पाहायला मिळाले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे समभाग 2.90 टक्के घसरणीत होते.
Advertisement
Advertisement